ताज्या घडामोडी

शाळेतील शिक्षक लोक स्थाईक रहिवासी दाखवून करीत आहेत शासनाची दिशा भूल!

अंकित क-हे

ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापूर तालूक्यातील ग्राम नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येत्या २३ नोव्हेंबर पासून सुरू झाले असून त्यासाठी नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग ९ वी ते १२ वी पर्यंत सर्व शिक्षक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये एक शिक्षक कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले होते या शाळेतील शिक्षकांनी आम्ही नया अंदूरा गावात स्थाईक स्थाईक रहिवासी आहोत असे शासनाला सागिंतले आहे परंतु केवळ नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षिका दोन कर्मचारी स्थाईक रहिवासी आहेत बाकी शेगांव अकोला येथे रहिवासी आहेत ते शिक्षक लोक गावात रहिवासी आहेत असे सांगून दर महिन्याला शासनाच्या कडून रहिवासी भाडे विज बिल ट्रॅक्स म्हणून पैसे वसुल करीत आहेत.नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १९ नोव्हेंबर रोजी एक शिक्षक कोरोना संक्रमित झाल्यानंतर गावातील लोकांच्या लक्षात आले की कोरोना संक्रमित असलेला शिक्षक हा तर नया अंदूरा गावात स्थाईक रहिवासी तर नाही मग नया अंदूरा गावात कोरोना संक्रमित निघाल्याचे कसे समजले होते शिक्षक शेगांव किंवा अकोला येथे रहिवासी आहे मग नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक असेच खोटे कामे करून शासनाच्या कडून पगार सोडून वेगळे पैसे घेत असल्याचे समोर येत आहे .शासनाने शिक्षक लोकांना स्थाईक रहिवासी असल्या नंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे रहिवासी दाखला किंवा गावातील पोलीस पाटील यांचे रहिवासी अोळखपत्र असावे अन्यथा शिक्षक लोकांना येणार भत्ता रद्द करावा अशी मागणी गावातील स्थाईक रहिवासी यांनी केली आहे.नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक लोकांची संख्या कमीत कमी जवळपास ४० शिक्षक आहेत त्यापैकी १ मुख्याध्यापक १ शिक्षिका २ कर्मचारी हे फक्त स्थाईक रहिवासी आहेत ३६ शिक्षक शेगांव किंवा अकोला येथे स्थाईक रहिवासी आहेत त्यांना शासनाने नया अंदूरा गावात स्थाईक रहिवासी राहण्यासाठी सुचना द्याव्या किंवा त्यांना मिळणारा भत्ता म्हणजे पैसे देऊ नये शिक्षक लोक पगार सोडून वेतिरीक्त पैसे घेऊन काळाबाजार करीत आहेत त्यांच्या कडे लक्ष केंद्रित कोण करणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.३६ शिक्षक लोकांचा भत्ता म्हणजे जवळपास एका शिक्षकाला कमीत कमी तीन हजार रुपये तर ३६ शिक्षक लोकांचा वेतिरीक्त पैसा म्हणजे तो १लाख ८ हजार रुपये दर महिन्याला आहे तर बारा महिन्याची रक्कम १२ लाख ९६ हजार रुपये शासनाला सरासरी वेतिरीक्त पैसा द्यावा लागत आहे यामध्ये शिक्षक लोक शासनाच्या हातावर तुरी देत असल्याचे दिसून येते आहे म्हणून शासनाने शाळा सुरू केल्यानंतर शिक्षक लोक स्थाईक रहिवासी असतिल तेव्हा त्याचा पगार द्यावा व त्यांच्या भत्ता म्हणजे वेतिरीक्त पैसा द्यावा अशी मागणी स्थाईक रहिवासी यांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: