ताज्या घडामोडी

काकड आरती व वैज्ञानिक दृष्टी

प्रशांत चिंचोळकर
अकोला एक्सप्रेस न्युज सिरसो तालुका मूर्तिजापुर

कृषक बांधव पौर्णिमे पासून काकड आरती प्रारंभ करीत असतात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तिचा अखंड गजर सुरु असतो तर काही ठिकाणी कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे ला काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केली जाणारी आरती होय त्यावेळी देवाच्या मूर्तीला काकड्या यांनी म्हणजे एक प्रकारच्या ज्योतीने ओवाळण्यात येते म्हणून तिला काकड आरती म्हणतात ऐदी. आळशी. व चैनी वृत्ती काकडा च्या रूपाने जाळून स्वतः ला नेहमी उत्साही व ताजेतवाने ठेवण्यासाठी त्याची फार गरज आहे. उठा उठा सकळीक वाचे स्मरा गजमुख रिद्धी सिद्धी चा नायक स्नान करा गंगेचे एकेकाळी समस्त गावकरी परिसरातील लोक जमुन सामुहिक रित्या काकड आरती करीत असत परंतु अलीकडच्या काळात तिच्यासाठी होणारी गर्दी ओसरू लागली आणि आरतीत येणार्‍या तरुणाची ही संख्या रोडावली आता केवळ गावातील जेष्ठ भाविक महिला व पुरुष मंदिरात गोळा होऊन काकड आरती करतांना आढळतात कारण ईश्वर भक्ती हा केवळ म्हाताऱ्यांचा विषय आहे असा सर्वांचा गैरसमज आहे पहाटे लवकर उठण्याची ज्यांना हैस नाही ते खरोखरच जीवनात आळशी वृत्तीचे निघाल्याची ओरड ऐकू येते म्हणून सत्पुरुष यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन ईश्वर भक्तीची त्याला शोभिवंत झालर लावली भक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य लोक ही चांगली आरोग्यदायी सवय अंगळणी पाडू शकतात म्हणूनच काकड आरतीची एक चांगली परंपरा कायम रूढ झाली म्हणून काकड आरती कडे केवळ धार्मिक दृष्टिकोन वक्ता वैज्ञानिक भिंगातून ही ही डोकावून पाहणे महत्वाचे आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: