ताज्या घडामोडी
वाडेगाव येथे अपघात युवकाचा जागेवर मृत्यू

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे अपघात होवून विस वर्षीय युवकाचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकविस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव बसस्थानक परिसरात अज्ञात वाहनाने विस वर्षीय युवकाला जोरदार धडक दिली असता राम गजानन बोबडे रा वाडेगाव या युवकाचा जागेवर मृत्यू झाला असून पोलिस उपनिरीक्षक वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र अहेरकर सुर्यवंशी आडे विशाल जावळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पसार झालेल्या वाहनचालकावर कलम २७९ ३०४ अ भादवि १८४ ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येवून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.