डॉ जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालयाला मुक्त विद्यापीठ बी.ए चा शिक्षणक्रम मंजुर.
संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी वर्गाकरीता विशेष बाब म्हणून स्थानिक डॉ जगन्नाथ ढोणे आर्ट अॅंड सायन्स ज्युनियर कॉलेज ला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बी ए प्रथम वर्ष अभ्यासक्रम मंजूर झाला आहे केंद्रीय मानव संसाधन मंत्री ना संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नाने आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी वर्गाकरीता विशेष बाब म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्र विद्या शाखेचे बी ए च्या अभ्यासक्रमाला शैक्षणिक वर्ष सन 2020-2021या वर्षापासून मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांनी मान्यता दिली आहे. मानव्यविद्या व सामाजिक शास्त्र विद्या शाखेचे संचालक डॉ नागार्जुन वाडेकर आणि विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ प्रकाश देशमुख यांनी दिलेल्या मंजुरी पत्रानुसार यावर्षी च्या शैक्षणिक सत्र सन 2020-2021 याकरिता विद्यार्थी वर्गाचे प्रवेश होतील ही बाब स्पष्ट केली आहे आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी वर्गाकरीता विशेष बाब म्हणून ना. संजय धोत्रे यांचे विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या मुक्त विद्यापीठाच्या ह्या अभ्यासक्रमासाठी परीसरातील विद्यार्थी वर्गाने प्रवेश घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष डॉ जगन्नाथ ढोणे व प्राचार्य संजय निमकर्डे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.











