ताज्या घडामोडी

आक्रमण संघटनेद्वारा उत्तर प्रदेशातील हाथरस हत्याकांड प्रकरणी निवेदन

अविनाश एस. पोहरे – संपादक

अकोला (दि.१३ ॲाक्टोबर २०२०)- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित मुलीचा सवर्ण युवकांनी सामुहीक बलात्कार करुन तिचा खून केला ही संपूर्ण विश्वासाठी निंदणीय बाब आहे.हि घटना इतकी लाजीरवाणी आहे की, आपल्या भारत देशाला विश्वातील देशासमोर शरमेने मान खाली घालणारी आहे.विश्वातील मानवी समाजाला काळीमा फासणारी आहे.आक्रमण महिला संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र या घचनेचा तिव्र निषेध करते.यासाठी सर्व जबाबदार घटकांना फाशीची चं शिक्षा झाली पाहिजे असा आग्रह सुद्धा करते. आणि खालील मागण्या करीत आहे.1)मागणी नसतांना व विरोध करूनही यूपी सरकारने हा तपास सीबीआय’कडे का दिला? 2)ती अत्याचारग्रस्त मुलगी तीचा मृत्यू झाल्यानंतर शव तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता पोलिसांनी अर्ध्या रात्री चोरून शवाची विल्हेवाट का? लावली.3)मुलींच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांना एवढा संघर्ष का करावा लागला ?

  1. या प्रकारातील आरोपींना फाशीची चं शिक्षा झाली पाहिजे.
  2. उत्तर प्रदेशचचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा व हे सरकार बरखास्त करावे.. कारण उत्तर प्रदेशामधे दलितांवर अत्याचारांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढचं होतांना दिसत आहे.
  3. हे प्रकरण सीबीआयकडून काढून घ्यावे व हे प्रकरण न्याय खात्यामार्फत चं सर्वोच्च्य न्यायालयात चालवावे
  4. या प्रकरणामध्ये दिरंगाई करणारे उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा.
  5. अत्याचारग्रस्त मुलींच्या नातेवाईकांना संरक्षण देण्यात यावे.
  6. या प्रकरणात ज्या ज्या घटकांनी दबाव आणला त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.अत्याचारग्रस्त मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वरील मागण्या मान्य कराव्यात अशाप्रकारचे निवेदन मा. राष्ट्रपती यांच्या कडे मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत पाठविण्यात आले याप्रसंगी सुरज मेश्राम जिल्हाध्यक्ष आक्रमण संघटना, सौ शितल राऊत महिला अध्यक्ष, अदिती मेश्राम , सौ अरुणा निखाडे, सौ पूनम दंदी, सौ निर्मला गजभिये, सौ जयश्री खोब्रागडे, हिणा चौधरी महानगर उपाध्यक्ष, राजेश भिमकर महासचिव, अर्जुन बागडे, ॲड कुणाल शेंडे, सौ सुनंदा चांदणे , राहुल इंगोले सचिव , रेखा निखारे, उषा वाकोडे उपस्थित होते.

                 
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: