ताज्या घडामोडी

सुका कचरा – ओला कचरा वर्गीकरणाचा महापालिकेसोबत सोसायट्यांना विसर

अनंतकुमार गवई
प्रतिनिधी : नवी मुंबई

वर्षभरापूर्वी सोसायटीमधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करून द्या, असे न केल्यास हा कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा नवी मुंबई महापालिकेने शहरवासीयांना नोटिशीद्वारे दिला होता. मात्र अचानकपणे स्वच्छ नवी मुंबई साठी धडपडणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या सुका” कचरा, ओला कचरा” मोहीम हवेत विरली असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेसोबत स्थानिक सोसायट्यांनी देखील याबाबत जबाबदारी स्वीकारली नसल्याने या मोहिमेचा विसर महापालिका आणि नागरिकांना पडला आहे असे दिसून येते.शहरातील कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही वर्षभरापूर्वी घनकचरा विभागाद्वारे प्रभावीपणे सुरू करण्यात आली होती. त्यासंदर्भात अनेक सोसायट्यांना आवाहन करण्यात आले होते. तशी पत्रकेही सोसायट्यांमध्ये वाटण्यात आली होती. काही सोसायट्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करण्यास सुरुवात केली होती.तसेच ज्या सोसायट्या कचऱ्याचे वर्गीकरण करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे तुर्भे कचराक्षेपणभूमीला एकत्रित जाणाऱ्या सुमारे ६०० मेट्रिक टन कचऱ्यापैकी २१ मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण सोसायट्यांकडून होऊ लागले होते. मात्र हि मोहीम केवळ आवाहनांपुरती सीमित राहिली असल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण महापालिकेकडून अथवा सोसायट्यांकडून केले जात नाही. यामुळे ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंडय़ाचे कवच, नारळ, शहाळी, हाडे तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, रबर, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या आणि काच, बॅटरी सेल, धातू, खिळे असे दोन्ही घटक एकत्रितरित्या विघटन केले जात आहेत. तर दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग महापालिकेकडून २-३ दिवस उचलले जात नसल्याचा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. यामुळे एकूणच स्वच्छ नवी मुंबई म्हणवणाऱ्या शहरात महापालिकेचे नियोजन शून्य कारभार सुरू आहे का अशी शंका उपस्थित होत आहे.महापालिकेचा वेबसाईटवरील घनकचरा विभागाचा नंबर ” संपर्क क्षेत्राच्या बाहेर”
नवी मुंबई महापालिका स्मार्ट पालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे स्मार्ट पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पालिकेने नागरिकांना सुलभ व्हावे म्हणून ऑनलाईन वेबसाईट उभारली आहे. मात्र या वेबसाईट मधील अनेक नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. तर तक्रार करण्यासाठीच्या स्थळावर गेले असता त्या तक्रारीची दखल घेण्यात येत नाही अशी तक्रार वाशी येथील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे अनेकदा कचऱ्याचे ढीग सोसायटीच्या बाहेर अथवा चौकात पडला असताना तक्रार करण्यासाठीचा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर सांगितला जातो हे स्मार्ट पालिकचे अपयश आहे असेही नागरिकांकडून बोलले जात आहे.”लॉकडाऊन काळात ओला कचरा – सुका कचरा वर्गीकरण करता आले नाही. आताही तसे वर्गीकरण करताना काही अडचणी येत आहेत. पण आम्ही लवकरात लवकर त्याबाबत जनजागृती करू आणि पुन्हा ओला कचरा – सुका कचरा वर्गीकरण करण्यास सुरुवात करू असं घनकचरा व्यवस्थापन विभागाचे
उपायुक्त – बाबासाहेब राजळे यांनी सांगितले”

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: