स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू करणे बाबतीत निवेदन

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला. अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणे बाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये अकोला येथे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता गंभीर रूग्ण यांना वैद्यकीय सेवे संदर्भात नागपूर येथे जावे लागते त्यामुळे रुग्णांना अधिक खर्च तसेच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे करीता अकोला येथील बांधकाम पूर्ण झालेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू करण्यात यावे असे सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे त्यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे आकाश जंजाळ सचिन जंजाळ चिकु वानखेडे अमीत गजभिये सुमीत पाखरे गोपाल पाटील पवन सावदेकर सौरभ डोंगरे सह कपील मेश्राम तसेच आदी उपस्थित होते