ताज्या घडामोडी

तेल्हारा तालुका व शहर भाजपा च्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या कृषी विधेयक स्थगीती पत्रकाची होळी करून निषेध करीत तहसीलदारांना निवेदन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

पंतप्रधान मा.श्री नरेन्द्रजी मोदी यांनी ऐतहासीक कृषी विषयक विधेयक मंजुर करुन शेतकऱ्यांच्या जिवनात आमुलाग्र बदल घडविणारे पाऊल उचलले आहे.
माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केन्द्राने मंजुर केलेल्या कृषी कायद्याच्या अमंलबजावणीस राज्यात स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आघाडी सरकाचा निषेध करण्यासाठी आज दिनांक ०७/१०/२०२०रोजी भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या स्थगीती आदेशाची होळी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. व केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची अमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. केंद्रीय राज्य मंत्री मा.संजय धोत्रे , जिल्हा अध्यक्ष आ.श्री.रणधीर सावरकर ,मा . आमदार प्रकाश भारसाकळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.तेजराव थोरात व महिला प्रदेश कार्यकारणी उपाध्यक्ष नयनाताई मनतकार तेल्हारा तालुकाअध्यक्ष गजानन उंबरकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुका व शहर तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले तालुका व शहरातील सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामध्ये श्री. गजानन उंबरकार .गजानन नळकांडे .महेंद्रजी गोयंनका .अनिल पोहणे .ओम सुईवाल .रवि गाडोदिया, पुंजाजी मानकर .ज्ञानेश्वर सरप.धर्मेश चौधरी .पंकज देशमुख .नरेश आप्पा गंभीरे. प्रवीण येऊल. विशाल भुजबले. गजानन गायकवाड. प्रवीण राजनकर .गणेश इंगोले .महिला आघाडी अध्यक्ष सौ. मोनिकाताई वाघ. सौ आरती ताई गायकवाड .सुमित आप्पा गंभीरे. श्रीकृष्ण पवार, दीपक वानखडे, अनिकेत ढवळे, दीपक मोडक ,सोनू शिंदे , मनोज पालीवाल वाल ,ऋषभ ठाकूर ,व मोठ्या संख्येने तेल्हारा तालुका व शहर कार्यकर्ते उपस्थित होते…..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: