ताज्या घडामोडी
अकोला पाच दिवस बंदचे संकेत
राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला कोरोनाचा वाढता आलेख पाहता अकोला शहरात पाच दिवस बंद पाळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने झुम ॲपच्या माध्यमातून पदाधिकारी याची बैठक पार पडली असुन बैठकीत व्यापारपेठ बंद ठेवण्याचा एकमेव पर्याय समोर आल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व महानगर पालिकेचे आयुक्त संजय कापडणीस यांचे सोबत अकोला बाजार पेठ बंद ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे तर यामध्ये दुध व मेडिकल वगळता इतर सर्व बाजारपेठ दिनांक २५ ते २९ सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स च्या पदाधिकारी यांनी मत व्यक्त केले असून विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चा धाडसी निर्णय असल्याचे समोर आले आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.