अकरावी व बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा.. छात्रभारतीचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना निवेदन..

अनंतकुमार गवई
मुंबई
अनुदानित उच्च माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनकडुन शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा वाढीव शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी छात्रभारतीने आज शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना निवेदन देऊन केली.
अनुदानित उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये इ. ११ वी व १२ वी वर्गासाठी शुल्काचे दर हे शासनाने निश्चित केल्यामुळे सदरचे दर सर्वांसाठी समान आहेत. मुंबईमध्ये अनेक महाविद्यालये सर्रास शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क विद्यार्थ्यांनकडुन वसुल करत आहेत.
शिक्षण उपसंचालकांनी आपल्या स्तरावरुन सर्व महाविद्यालयांना शासनाने प्रमाणित केलेल्या दरापेक्षा वाढीव शुल्क आकारु नये याबाबत अवगत करावे व यामध्ये दोषी आढळणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करत विद्यार्थ्यांनकडुन वसुल केलेले वाढीव शुल्क परत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले निवेदनाद्वारे केली यावेळी छात्रभारतीचे कार्यकारिणी सदस्य निकेत वाळके हे देखील उपस्थित होते.