०८ मार्च जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

अविनाश पोहरे – संपादक
जुन्नर,जिल्हा – पुणे यांच्या वतीने ०८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रिडा क्षेत्रातील कर्तुत्ववान रणरागीणी महिलांचा व पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष तथा लघुउद्योजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांचा स्मृतिचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या वृद्धाश्रमात असे वृद्ध पुरूष व महिला आहेत कि ज्यांचं या जगात कुणीच नाही जे पुर्णपणे निराधार आहेत.ठाण्याच्या एका दाम्पत्याने या आश्रमासाठी चार एकर जागा एका डोंगराच्या पायथ्याशी या सेवाभावी संस्थेला दान दिली आहे.या वृद्धाश्रमात एकूण चाळीस पुरूष व महिला असे निराधार अंध अपंग वृद्ध आहेत.येथील निराधारांसाठी पिण्याच्या पाण्याची व जंगलभाग असल्याने बिबट्यांपासून बचाव करण्यासाठी या वृद्धाश्रमात पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या दोन सिंन्टेक्सच्या टाक्या व एक एकर जागेला स्टील व तारेचे कंम्पाऊंड हे जवळपास एक लाख रुपये किंमतीचे साहित्य पातुर तालुका विकास मंचचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी वृद्धाश्रमाला दान दिलेले आहे.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.