डॉ.संदीप सुशीर यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

संदीप सुशीर / अमरावती
दर्यापूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून जनसामान्यांच्या बुलंद आवाज साप्ताहिक दर्यापूर दर्पण चा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा थोडक्यात संपन्न करण्यात आला.या वर्धापन दिन सोहळा प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार डॉ.संदीप सुशिर यांना बेटी फाउंडेशन वनी जिल्हा.यवतमाळ च्या वतीने त्यांच्या गोसेवा व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार कुरियर द्वारे देण्यात आला होता.सदर पुरस्कार हा दर्यापूर दर्पण च्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून पुरस्काराचे स्वरूप हे ट्रॉफी कप,मेडल,,शाल,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण उद्घाटक म्हणून आरोग्य सभापती बाळासाहेब हिगनीकर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाबाराव बरवट ज्येष्ठ विचारवंत विजयराव विल्लेकर संभाजी बिग्रेड राज्य प्रवक्ता प्रेमकुमार बोके समाज प्रबोधन कार संदीप पाल महाराज ज्येष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख शरदभाऊ रोहनकार आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच साप्ताहिक दर्यापूर दर्पण ला योगदान करणाऱ्यांचा व वर्षभर विशेष कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी दर्यापूर दर्पण हे वर्तमान पत्र हे येणाऱ्या काळात पत्रकार क्षेत्रात मोठे काम करेल असा विश्वास पाहुण्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्तविक धनंजय देशमुख व मनोगत निलेश पारडे यांनी केले संचालन गजानन हेरोडे तर मुख्य संपादक अमोल कंटाळे यांनी सर्वांचे आभार मानले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला मोजकीच पाहुणे व प्रतिनिधी तसेच वाचक उपस्थित होते.