बौद्ध समाजातील तरूणीला पोलीस स्टेशन मध्ये बंद दरवाज्यात मारहाण
–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद आक्रमक
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
अकोला – गीता नगर बायपास रोड अकोली येथील तेजस्विनी दिलीप सिरसाट ह्या बौद्ध समाजातील सुशिक्षित विद्यार्थीनी असून सदर युवतीने बुद्धभूषण दिनकर इंगोले नामक भारतीय सैन्यात कार्यरत असणाऱ्या युवकाविरुद्ध भांदवि कलम ३७६,४१७,५०६,३७६(२)(n)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.परंतु पिडीत युवतीच्या तपासामध्ये हेतुपुरस्पर पणे गरीब असल्यामुळे व पाठीशी कोणी नसल्यामुळे दिरंगाई करण्यात आली.पीडित युवतीने ह्या सर्व प्रकाराची तक्रार १६/०९/२०२० रोजी जुने शहर पोलीस स्टेशन अकोला विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे तक्रार दिली होती व याचा राग व जातीभेद ह्या गोष्टी मनात धरून पीडित युवतीला दिनांक २४/०२/२०२१ रोजी चार्जशीट दाखल करण्याचा निमित्ताने बयान घेण्यास फोन करून तपास अधिकारी वर्षा राठोड ह्यांनी बोलविले व पीडिता गेली असता पोलीस कर्मचारी तथा पीडिता प्रकरण तपास अधिकारी वर्षा राठोड ह्यांनी पीडितेला उद्धट पणे वागणूक देत चार्जशीट मधील कागद फाडली व तेवढ्यावरच न थांबता मारहाण केली.मारहाणीमुळे पीडिता आरडाओरड करत होती तो आवाज ऐकत तिथे दुसरी महिला कर्मचारी आली व तिने सुद्धा मारहाण करण्यास सुरुवात केली.तेवढ्यात ठाणेदार महेंद्र देशमुख ह्यांनी एका बौद्ध समाजातील युवतीवर हात उचलून कायद्याची सीमा ओलांडली व गालावर मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली.व घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतो.अशी धमकी दिली तरी संबंधित प्रकरणात एका सुशिक्षित बौद्ध समाजातील तरुणीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ज्या पोलीस प्रशासनाकडे असते त्यांनीच जातीवाद बाळगून हेतुपुरस्पर पणे आमच्या समाजातील युवतीवर झालेल्या क्रूर अन्यायाचा जाहीर निषेध करीत असे अघोरी कृत्य करणाऱ्या जुने शहर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार महेंद्र देशमुख, पी.एस. आय.वर्षा राठोड व महिला कर्मचारी ह्यांच्यावर तात्काळ अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून ह्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.अन्यायग्रस्त पीडितेला योग्य तो न्याय देण्यात यावा असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्हाधिकारी अकोला ह्यांना इ मेल द्वारे निवेदन देऊन केली आहे .तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी ह्यावेळी दिला असून आंदोलनादरम्यान अनुचित प्रकारास पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा ह्यावेळी देण्यात आला.