सस्ती सनराईज ज्ञानपीठात सोशल डिस्टंसिंगचा वापर करून घेतली आरोग्य विभागाची परिक्षा !

अविनाश पोहरे – संपादक
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची २८ फेब्रुवारी रोजी पातुर तालुक्यातील सस्ती येथिल सनराइज ज्ञानपीठ अँड ज्युनिअर कालेज मध्ये सोशल डिस्टंसिंग चा वापर करून सकाळ व दुपार अशा दोन सञात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची परिक्षा कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचे सर्व नियम पाळुन शांततेत घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क सरळ सेवा पद भरती करिता दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पातुर तालुक्यातील सनराइज ज्ञानपीठ सेमी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, सस्ती या परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग सरल सेवा पदभरती करिता सनराइज ज्ञानपीठ या परीक्षा केंद्रात एकूण ४९० परीक्षार्थी होते. यापैकी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर या पोस्ट करिता २४० परीक्षार्थी व लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदाकरिता २५० विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यामध्ये बिड, परभणी, नांदेड तसेच महाराष्ट्रातील इतर भागातुन आलेल्या सदर परिक्षार्थी विद्यार्थी यांनी परिक्षा केंद्रात प्रवेश करताना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिक्षा केद्रात कोरोना व्हायरसचे सर्व नियम पाळत परिक्षार्थी विद्यार्थी यांना सेनिटायझर व मास्क चे वितरण केले तसेच परिक्षा केद्रात सेनिटायझर ची फवारणी करून सकाळ व दुपार या सञात परिक्षा घेण्यात आली सदर परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून श्रीकांत ताले, सम्राट अंभोरे, विठ्ठल राऊत, डॉ.निलेश घाडगे, डॉ. आर. पी.पाटील व सनराइज ज्ञानपीठ चे इतर कर्मचारी यांनी काम पाहिले