जागतिक महिला दिनानिमित्त महासमृद्धी महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
आज दि. 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त बाळापूर तालुक्यातील ग्राम व्याळा आणि रिधोरा येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला श्री सौरभ कटियार सर यांचे मार्गदर्शन खाली महासमृद्धी महिला सक्षमीकरण कार्यक्रमा चा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्या मा. श्रीमती वर्षाताई वझीरे, मा. सभापती श्रीमती रुपालिताई गवई मॅडम, मा. उपसभापती श्री. दांदळे सर, मा. श्री सुरज गोहाड सर प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला, मा. श्री अक्षय सूक्रे सर, गट विकास अधिकारी, बाळापूर, मा. श्री गजानन महल्ले सर, मा. श्री इंगळे सर सदस्य पं स बाळापूर मा श्री नाकट सर विस्तार अधिकारी पंचायत, मा. गजानन भाऊ वझीरे, मा. श्री गोपाल भाकरे सर, मा. श्री. घनश्याम धनोकार सर, तालुका व्यवस्थापक बाळापूर, प्रभाग समनव्यक श्री. गौरव पाटील, श्री. रमाकांत पिल्ले, श्री मनोज वैद्य, श्रीमती मनीषा खराटे, श्रीमती. भावना चिंचोळकर, श्रीमती सोनाली बोरसे, आवास योजनेतील RHE श्री पवन पाटील, श्री हरणे, श्रीमती स्नेहा मैसने, श्रीमती कोमल तसेच समूहातील महिला उपस्तीत होत्या यावेळी समूहातील महिला आवास योजनेतील लाभार्थी म्हणून त्यांना रुपये 60000/- निधी महिला ग्रामसंघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले सोबत बँक व्यवस्थापक श्री खांडेकर सर यांनी बँक मेळावा मध्ये 56 समूहांना 65.72 लक्ष्य कर्ज मंजूर केल्याने त्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ आणि प्रशिस्तपत्र देऊन गौरविण्यात आले आहे तसेच महिलांचे हस्ते आवास योजनेतून घर बांधकाम पूर्ण झालेल्या ठिकाणी गृहप्रवेश कार्यक्रम आणि नवीन ठिकाणी घरकुल भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.