रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला यश दि.पी.एस. विद्यालय पिंपळखुटा ची परत होणार चौकशी

–रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांचा विद्यार्थी हितार्थ लढा
अविनाश पोहरे – संपादक
पातूर तालुक्यातील दी.पी.ई. एस. विद्यालय पिंपळखुटा येथे 18 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास उर्वरित शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांना परत द्यावा असे राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिले असताना सुद्धा सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक व संदीप चव्हाण व शिपाई सुरेश खोडके यांना तांदूळ चोरी करून नेताना सर्व गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते.व ह्या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण सुद्धा करण्यात आले होते.ह्या प्रकरणी सदर मुख्याध्यापक व शिपाई ह्यांच्यावर फोजदारी कार्यवाही करण्यासाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला द्वारा निवेदन देण्यात आले होते.व जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या नेतृत्वात मागणीसाठी 9 ऑक्टोबर 2020 रोजी ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.व ह्याआधी झालेली चौकशी संपूर्णपणे खोटी असून परत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.ह्या सर्व घटनेची गांभीर्याने दाखल घेऊन शिक्षणाधिकारी वैशाली ठग मॅडम प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हापरिषद अकोला ह्यांनी परत त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून चौकशी समितीमध्ये रतनसिंग पवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पातूर,मनोज गवई,अधीक्षक पं. स.मूर्तिजापूर व अलिम देशमुख विस्तार अधिकारी जि. प.प्राथमिक शिक्षण विभाग अकोला ह्या त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून शालेय विद्यार्थ्यांचा पोषण आहार हा चोरी करून अपहार करणाऱ्या दोषींवर निष्पक्ष चौकशी करावी व चौकशी समितीमध्ये सबळ पुरावे असून त्या अनुषंगाने आकाश हिवराळे जिल्हासंघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला हे समक्ष हजर राहतील व सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी लढा देत राहतील असे अश्वासन त्यांनी दिले असून प्राथमिक शिक्षण विभागाचे आभार मानले आहेत.