जि. प. उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांच्या हस्ते पातूर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

जि. प. अकोला दलित वस्ती व विविध निधीतुन ३ कोटी २० लाख रुपयांच्या विकास कामांना सुरुवात
प्रविण पोहरे – कार्यकारी संपादक
पातूर :- पातूर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवार दि. १ मार्च २०२१ रोजी अकोला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे हिरासिंग राठोड, दिपक धाडसे, डॉ. ओमप्रकाश धर्माळ, अर्जुन टप्पे, पातूर पं. स. सदस्य सौ. सुनिताताई अर्जुन टप्पे, पातूर पं. स. जे.ई. कपिल पवार, भारिप बहुजन महासंघाचे पातूर तालुका महासचिव राजुभाऊ बोरकर, शिर्ला सरपंच पती संजय सिरसाट, दिनेश गवई, योगेश इंगळे, प्रविण पोहरे, पंकज पोहरे, अनिल राठोड निखिल इंगळे आदि. भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात दलित वस्तीच्या रस्त्याचे तथा सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन यावेळी उपस्थित जि. प. उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई हिरासिंग राठोड व भारीप बहुजन महासंघ तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.दरम्यान पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत कोढारी सरपंच रामदास धानोरकर, उपसरपंच दिपक कावळे, अश्फाक अली, प्रल्हाद भारसाकळे, बंडू कांबळे, अल्ताफ अली, गजानन लोखंडे, सिध्दार्थ कांबळे, ग्रामपंचायत जांब सरपंच समाधान घायवट, उपसरपंच जयराम हरी लठाड, ग्रामसेवक रमेश पोटे, राजु मारोडकर, अमोल रमेश घायवट, मनोज घायवट, आलेगांव वंचित बहुजन आघाडी सर्कल प्रमुख निलेश तेलगोटे, ग्रामपंचायत बोडखा सदस्य गणेश राठोड, सदस्य सुरेश वानखडे, ग्रामपंचायत माळराजुरा सरपंच सौ. जयश्री घुगे, उपसरपंच मधुकर आडे, शिवाजीराव घुगे, दामोदर चव्हाण आदि ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.