पातूर येथे सात दिवसीय सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला उत्साहात सुरवात

द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहूउद्देशीय संस्थेचा अनोखा उपक्रम
अविनाश पोहरे – संपादक
पातूर : पातूर शहरातील प्रथमच होतकरू मुलां मुलींकरिता द प्रोफेशनल करिअर अकॅडमीच्या वतीने पंकज पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुरुवात उत्साहात झाली. असून विद्यार्थी जोमाने सहभागी झाले. या सात दिवसीय आर्मी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मैदानी व लेखी प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्याची भावी पिढी ही देशसेवेच्या कामी यावी व त्यांना योग्य दिशा मिळावी हा या प्रशिक्षणा मागचा मुख्य उद्देश आहे.
पातूर शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी नेहमीच समाजहिताच्या कार्यात पुढे असताना दिसते. या प्रशिक्षणासाठी 14 ते 25 वयोगटातील मुलांनी कमालीची हजेरी लावली. या सात दिवसीय प्रशिक्षणामध्ये पूलअप्स, सोळाशे मीटर रनिंग, लांब उडी, गोळा फेक, इत्यादी सर्व प्रकारचे मैदानी प्रकार शिकवण्यात येत आहेत. सदर आर्मी प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शक आर्मी कमांडो सुरज गवई हे असून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी शिस्त व मेहनत यावर जोर देऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली.
सदर प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून सैन्यदलात तेरा वर्षापासून देशसेवा करत असलेले आर्मी कमांडो सुरज देवानंद गवई हे असून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व मेहनत यावर विशेष लक्ष देऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली.पातूर तालुक्यातील शिर्ला येथील रहिवाशी असलेले आर्मी कमांडो सुरज गवई यांना जवळ जवळ नऊ प्रकारच्या भाषेचे ज्ञान अवगत आहे. त्यांचे शालेय शिक्षण गरीब परिस्थितीतून झाले असून त्यांनी कठोर परिश्रम व मेहनत करून तरुण युवकांसमोर एक नवा आदर्श मांडला आहे. जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीवर त्यांचा विश्वास आहे.
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले तेरा वर्षे पासून देश सेवा करणारे आर्मी कमांडो सुरज देवानंद गवई त्यांच्या मधल्या सुट्टी दरम्यान सुद्धा कुटुंबाला वेळ न देता युवकांना सैन्य भरती प्रशिक्षण देणे सुरू केले.लोकसेवा म्हणून गरीब व होतकरू मुलांना भारतीय सैन्य दल,पोलीस भरती, सी.आर.पी. एफ,आदी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.युवकां कडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.या प्रशिक्षणाला पालकांचा सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सदर प्रशिक्षणाचे आयोजक द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन संपूर्ण प्रशिक्षण सोशल डिस्टंसिंगचे पालन करून
स्व. वंदनाताई जगन्नाथ ढोणे वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे.