गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी पोलीस अधीक्षकांना निवेदन.
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातूर – येथील महात्मा फुले महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक करून महाविद्यालयाचे आणि संस्थेचा शिस्तीचा भंग केला आहे या आशयाची तक्रार पातुर पोलीसात संस्थेचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी 22 सप्टेंबर 2020 रोजी पातुर पोलिसात केली होती.
परंतु या अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत करण्यात आली नसल्याने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे धाव घेऊन पुन्हा 2 मार्च 2021 रोजी एक लेखी तक्रार देऊन या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदरची तक्रार त्यांनी 2 मार्च २०२१ रोजी दिली आहे महात्मा फुले कला विज्ञान महाविद्यालयामध्ये यातील गैरअर्जदार कर्मचारी गैर कायदेशीररीत्या उपोषणाला बसले होते. तसेच कार्यालयाच्या कामातील अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर करीत होते.यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष बोचरे यांनी त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस संस्थेच्या डाक द्वारे शिपायाच्या मार्फत पाठवली होती.
ही नोटीस कर्मचारी यांनी वाचून घेण्यास नकार देऊन संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष बोचरे यांच्यासोबत वाद घातला. त्या वादामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी यामध्ये दोन महिला कर्मचारी असल्याने दुरून बोला अशी विनंती करीत होते.
मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व ते अंगलट करून मला पकडत होते असे संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष बोचरे यांनी निवेदनात नमूद केले असून यामुळे मला सदरची घटना अपमानास्पद वाटली व त्याचा मला फार मानसिक त्रास झाला आहे म्हणून मी 22 सप्टेंबर 2020 रोजी या घटनेची प्रथम तक्रार पातूर पोलिसात नमूद केली. त्याचबरोबर पातूर पोलीस स्टेशन यांना वारंवार संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याकरिता विनंती केली मात्र पोलीस स्टेशन पातुर यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेली आणि सदरची तक्रार थंडबस्त्यात ठेवली सदरची तक्रार थंडबस्त्यात ठेवल्याने यातील गैरअर्जदार कर्मचाऱ्यांची हिम्मत वाढत गेली या कर्मचाऱ्या पासून मला धोका प्राप्त होत आहे आणि भविष्यात गंभीर मारहाण किंवा वाईट कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या जीवितास हानीची दाट शक्यता आहे कुठल्याही प्रकारच्या खोट्या आरोपामुळे माझे मानसिक संतुलन बिघडू शकते त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांना केली आहे. प्रथम तक्रारीच्या प्रति कुलसचिव
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती आणि महाविद्यालयाचे प्राचार्य महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय पातूर आदींना सुद्धा दिल्या आहेत.