पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या फलकाचे अनावरणा निमित्त दान दात्यांचे आभार

डॉ संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दर्यापूर : महाराष्ट्रातील धनगर समाजाची मुलुख मैदानी बुलंद तोफ,तडफदार युवा नेते, माननीय विधानपरिषद आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांचे विदर्भ दौऱ्यादरम्यान दर्यापूर नगरी मध्ये दिनांक 31जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर पॉईंट एसटी आगार समोर मुर्तीजापूर रोड दर्यापूर येथे आगमन झाले असून यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक,राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाचे अनावरण मोठ्या थाटामाटात व मल्हारमय जयघोषात करण्यात आले व पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून शासकीय विश्राम गृह दर्यापूर येथे धनगर समाज बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.मा.आ.गोपीचंदजी पडळकर साहेबांचे सर्वांनी पुष्पहार घालून धनगर समाजाच्या वतीने स्वागत केले.तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या अनावरण सोहळ्याच्या शुभप्रसंगी तन-मन-धनाने आर्थिकदान करणारे दान दाते डॉ.संदीप सुशिर,संजयभाऊ घटाळे,गंगाधरराव साबे,अमोलभाऊ नवलकार,अरविंद पावडे,नंदकिशोर कोगदे,दिगंबर नवलकार,मानिकरावजी नागे,अतुलभाऊ नवलकार,हरिभाऊ नागे,प्रदीप पातूर्डे,दादाराव जोगी,पंजाबराव नागे,श्रीधरभाऊ कोल्हे,सुरेशभाऊ चि.नवलकार,श्रीकृष्ण गु.नवलकार,दीपकभाऊ लताड,साहेबराव नागे,गोपालभाऊ नवलकार,उमेशभाऊ नागे,गोपालभाऊ नागे,हरिदास नवलकार,गजानन पातूर्डे,घाटोळसर,चेतन नवलकार तुळजाई इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर या सर्व दानदात्यांनी कार्यक्रमाला स्वइच्छेने आर्थिक मदत केली.तसेच यावेळी विदर्भातील युवानेते शिवदास बिडगर साहेब,माऊली हळणवार, मा.आ.गोपीचंद पडळकर साहेब यांचे सर्व साथीदार व दर्यापुर तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सर्व आजी-माजी ज्येष्ठ-श्रेष्ठ धनगर समाज सेवक व त्यांचे सहकारी तसेच तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बंधू-भगिनींनी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देऊन साजरा करण्यात आलाबद्दल या अनावरण सोहळ्याच्या शुभप्रसंगी तन-मन-धनाने दान करणाऱ्या सर्व दान दात्यांचे व सर्व धनगर समाज बंधू भगिनींचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपस्थितांचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे अमरावती जिल्हाअध्यक्ष डॉ.संदीप सुशिर यांनी सर्वांना येळकोट येळकोट जय मल्हार मनाचा मुजरा करून सर्वांचे मल्हारमय जाहीर आभार मानले.