आस्टूल येथे संत गाडगेबाबा यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त गावांतील साफसफाई करून साजरी.

प्रहार बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
अविनाश पोहरे – अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क,पातूर
संत गाडगेबाबा ह्यांच्या जयंतीनिमित्त प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल द्वारा उपक्रम राबविण्यात आला.व त्याचे औचित्य साधून कोरोना नियम माक्स लावून व फिझिकल डिस्टंसिंग चे पालन करून हा कार्यक्रम राबविण्यात आला. ह्यावेळी ,मास्क लावून गावातील परिसरातील नाल्या व रस्ते आणि भीमज्योत बुद्ध विहार ,क्रांती ज्योती महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्या स्मारकांन समोर साफ सफाई करण्यात आली. नागरिकांना सुद्धा मास्क लावून व सार्वजनीक ठिकाणी सिनिटायझर यांचा सिलकाव करून संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे आयोजन प्रहार बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष अमोल करवते यांनी केले.
आस्टूल येथे प्रहार बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा प्रहार सेवक पातूर अमोल करवते यांनी संत गाडगेबाबा ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण करून वंदन केले यावेळी गावातील असलेले नागरिक व संस्थेचे सदस्य संस्था सचिव आकाश करवते प्रकाश संपत करवते कोषाध्यक्ष ,सदस्य राहुल करवते , उपस्थित असलेले नागरिक,रविकांत कांबळे,सुजीत इंगळे सुनील रमेश इंगळे,विनोद इंगळे ,ऋषीकेश घुगेे,चेतन इंगळे,विशाल इंगळे, धिरज शिरसाठ,राजकुमार इंगळे,कुणाल हिवराळे,स्वप्नील इंगळे,अंकुश इंगळे,रोहित इंगळे, ,अंकित शिरसाठ,शुभम इंगळे,यश कांबळे ,आदित्य करवते,प्रदीप करवते,वंश विनोद इंगळे, दादू इंगळे आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.