राष्ट्रवादी महीला काॅग्रेस बाळापुर वतीने गॅस दरवाढी विरोधात आंदोलन

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
आज दी 28/2/2021 राष्ट्रवादी महीला काॅग्रेस बाळापुरवतीने गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले आदरणीय रूपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्षा यांच्या आदेशावरून जिल्ह्य़ाध्यक्षा उज्ज्वलाताई राऊत यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष सुनिताताई ताथोड यांच्या नेतृत्वात चुल मांडून मोदी सरकारने महीलांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन देऊन सर्व सामान्य कुटुंबातील चुल बंद करून त्यांना विश्वासा देत अच्छे दीनाचे स्वप्न दाखवत संपुर्ण देशात कोरोनासारख्या महामारीच्या आणी 22 मार्च 2020 पासुन लाॅकडाऊनच्या सुरू असलेल्या काळात सर्व सामान्यमाणसांच कुठल ही आर्थिक उत्पन्न नसतांना जाणीवपूर्वक गॅसच्या किमतीत वाढ करून दीलेल्या सवलतीचा व्याजासह पैसा वसुल करत शेवटी आज चुल मांडून स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आली असून वाढलेल्या गॅस दरवाढीविरोधात आज आम्ही महीला बाळापुर तालुक्यातून चुल मांडून केंद्र सरकारकचा जाहीर निषेध व्यक्त करतो या आंदोलनात ता उपाध्यक्ष रमाताई तायडे ता सचिव शिलाताई वाघ, महासचिव कनिजा परविन शाहीन परवीन सदस्य सिंधुताई वानखडे सुनिताताई बोरकर ज्योतीताई तायडे मंगलाताई डोंगरे गुजाबाई काळबागे यावेळी महीला पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदविला.