अकोट तालुक्यातील कासोद येथिल महाशिवरात्री यात्रा महोस्तव रद्द.

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधि
अकोट: तालुक्यातील श्री.विरभद्र तिर्थक्षेत्र कासोद,येथे महा शिवरात्रीच्या पावन पर्वावर दोन दिवस भव्य प्रमाणात यात्रा महोस्तवाचे आयोजन करण्यात येत असते.परंतु यावर्षी कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार श्री.वीरभद्र संस्थानच्या विश्वस्त मंडळाने सर्वानुमते ठराव घेवून यावर्षीचा दि.11 व 12 मार्च 2021 रोजीचा महशिवरात्री यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षापासूनची प्रथा बंद पडू नये म्हणून कार्यकारी मंडळातिल विश्वस्त व मोजक्या सेवाधारी यांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे व मोजक्या सेवाधारी यांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करुन व योग्य अंतर राखून यात्रा महोत्सवातिल पुजा अर्चना व महव्ताचे विधी पार पाडण्यात येतिल.संस्थानच्या वतीने भाविकांना कोणत्याही प्रकारची निवासाची व्यवस्था करण्यात येणार नाही.त्यामूळे भाविक भक्तांंनि दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात प्रवेश करुन गर्दी करु नये.व शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास प्रशासना मार्फत होणार्या कायदेशीर कार्यवाहीस गर्दी करणारे सर्वस्वी जबाबदार राहतील.त्या संदर्भात संस्थानचा काहीही संबंध राहणार नाही.करिता सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष ऐडवोकेट हेमंत सपाटे यांनी केले आहे.