शाळा बाह्य व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्या साठी विषेश मोहीम

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ राज्यात दि.१
एप्रिल, २०१० रोजी लागू करण्यात आला आहे.सदरकायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येकबालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदारशिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेतन
जाणारीबालके,ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्णकेलेले नसेल अशा ६ ते १४ वयोगटातील बालक एक महिन्यापेक्षा अधिककाळ सातत्याने अनुपस्थित
राहत असेल तर त्या बालकांना शाळाबाह्य बालक म्हणावे अशी व्याख्या शिक्षण हक्क अधिनियमानुसारकेली आहे तसेच अनेक ठिकाणी विट भट्टी , दगड कोळसा खान , बांधकाम , रस्ते , उसतोड अशा कारणाने अनेक कुटूंब स्थलांतरीत होतात त्या मूळे अशांची मुले शिक्षणा पासूण वंचीत राहू नयेत म्हणून अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे प्रवाहात अनन्यासाठी विषेश मोहीम राबविण्यात येत आहे बाळापूर येथे सुद्धा ही मोहीम राबविण्यात येत आहे शाळा बाह्य मुलांचा सर्वे करूण त्यांच्यात शिक्षणाचे महत्व पटवून देण्या साठी दि १ मार्च ते १० मार्च दरम्यान ही मोहीम राबविली गेली आहे