लाभार्थ्यांचे घरकुल रेती पासून वंचित…

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधि
अकोट तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पंतप्रधान आवस योजना व रमाई घरकुल योजने अतर्गत गोरगरीबाचे स्वप्नातले शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत मात्र रेती अभावी काम बंद पडल्याने दिसून येत आहे अकोट महसूल विभागाने रेती घेणाऱ्यांवर व रेती टाकणाऱ्यावर कार्यवाही चा ईशारा दिला असल्याने गोरगरिबांचे स्वप्नातले घरकुल आता अर्ध्यावर लटकले आहे त्यात कित्येक लाबर्थ्यानी आपले राहते घर पाडले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे बाधकामासाठी लागणारे साहित्य पडले आहे मात्र रेती अभावी घरकुलाचे बाधकाम रखडले आहे परप्रांतातून येणारी कन्हान रेतीची किँमत गगनाला भिडली असून एका ट्राली ची किँमत आठ हजार रुपये इतकी आहे अकोट तालुक्यातील प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून येथून कित्तेक ब्रास वाळू चोरी होत आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल रेती तस्करांच्या खिशात जाताना दिसत आहे या अवैद्य रेती उत्खननप्रकरणी अकोट महसूल विभाग पोलीस वेळोवेळी कारवाई करीत आहेत अवैध रेतीसाठे जप्त करून घरकुल बधकामा करिता दिले आहेत परंतु ते पुरेशे नाहीत शेकडो घरकुल आवसाकरिता हजारो ब्रास रेतीची गरज असल्याने दिसते रेती वेळेवर मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल रेती पासून वंचित आहे.तरी त्यांना त्वरित रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी गावकरी मंडळी करीत आहेत