ऑनलाईन आनापान शिबिराचे आयोजन

अविनाश पोहरे – अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातुर :- 31/01/2021 स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर चे विद्यार्थी महाराष्ट्र शासन आयुक्त शिक्षण कार्यालयाच्या मार्फत ऑनलाइन आनापान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विपश्यना विश्वविद्यापीठ धम्मगिरी इगतपुरी, जि. नाशिक यांच्या अंतर्गत विपश्यना साधना प्रसार केंद्र शिर्ला, पातुर येथील पूज्य भन्ते बी.संघपालजी आणि नांदखेड येथील आयु. जगन्नाथ गवई यांच्या मार्गदर्शनात तुळसाबाई कावल विद्यालयाचे चे विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन आनापान शिबिरात सहभागी झालेत. पू. सत्यनारायणजी गोयंका यांच्या ऑडिओ क्लिप मार्फत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आनापान कसे करावे हे याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा उद्देश महाराष्ट्रातील इयत्ता 5 वी ते 12 वी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये ते 31 जानेवारी 2021 सकाळी 8:00 वाजता शिबिरात सहभागी व्हावे.विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक संस्थेच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत, व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, प्राचार्य बी एम वानखडे, उपप्राचार्य एस बी ठाकरे, पर्यवेक्षक जी एस तारापुरे, जगमोहनसिंह गहिलोत, अंशुमनसिंह गहिलोत यांनी केले.