अमोल काळपांडे ह्यांचा पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राऊत साहेब ह्यांच्या हस्ते सन्मान

स्वप्नील पवार ह्या विद्यर्थ्यांचे शालेय ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाची गहाळ झालेली मूळ कागदपत्रांची फाईल दिली मिळवून.
अविनाश पोहरे – संपादक
पातूर शहरातील समता नगर येथील रहिवासी स्वप्नील कैलास पवार हया एम.एस्सी.भाग 2 च्या विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे 10 वी 12 वी,बी एस्सी सर्व मार्कशीट व पदवी,टायपिंग प्रमाणपत्र,एम.एस. सि आयटी प्रमाणपत्र,बँक पासबुक,आधार कार्ड,व इतर प्रमाणपत्र खामखेड मार्गे आगीखेड ते पातूर गॅस गोडाऊन च्या दरम्यान मोटरसायकल वरून नकळत पडले असून लाल रंगाची पिशवी मध्ये संपूर्ण कागदपत्रांची फाईल असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुश्याची जमा पुंजी होती. व त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले.शेवटी निराशा झाली परंतु अमोल काळपांडे नामक युवक हा पातूर येथील रहिवाशी असून आपल्या कामाकरिता पातूर वरून धाबा ला जात असताना आगीखेड नदीच्या पुलाजवळ त्याला ही फाईल दिसली.व दिसताच क्षणी स्वप्नील पवार ह्याला संपर्क करून माहिती दिली.हे ऐकताच स्वप्नील च्या आयुष्यात आशेची किरण आली.परंतु त्यास कारणीभूत असलेल्या अमोल च्या सतर्कतेने व माणुसकी ही जिवंत असून मनुष्य हा नेहमी प्रमाणिक आहे ह्याचे जिवंत उदाहरण दिले.त्याबद्दल त्याचा सन्मान पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राऊत साहेब, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हासंघटक आकाश हिवराळे,कैलास पवार,स्वप्नील पवार,गोविंदा भराडी आदी सर्वांच्या हस्ते पुष्प गुच्छ व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.व स्वप्नील पवार ह्याच्याकडून त्याचे आभार मानण्यात आले.