तुळसाबाई कावलचे कॅडेट्स पोलिओ डोस पाजण्यात सहभाग

अविनाश पोहरे – अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातुर:- ३१/०१/२०२१ स्थानिक तुळसाबाई कावल पातुर येथील एन सी सी युनिटचे कॅडेट तालुक्यातील ठिकाणच्या पोलीओ बुथवर जाऊन पोलिओ डोस पाजण्यात सहभाग घेतला. 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला, येथील सी.ओ. संजयजी पांडे, ऐ.ओ. अशोककुमार बक्षी यांच्या मार्गदर्शनात तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील कॅडेटस तालुक्यातील बोडखा, नांदखेड, भंडारज, शिर्ला, पातुर, वाघजाळी, राजनखेड, पास्टुल, पांगराबंदी या वेगवेगळ्या गावात जाऊन एनसीसीच्या समाज उपयोगी उद्देशापैक पोलिओ डोस पाजणे या समाजभिमुख कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक पोलिओ बूथ वर हजर राहून तेथे हे एकता आणि शिस्तीचे प्रदर्शन करत सहकार्य केले.कॅडेटस या कार्याचे कौतुक संस्थेच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत, व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, प्राचार्य बी एम वानखडे, उपप्राचार्य एस बी ठाकरे, पर्यवेक्षक जी एस तारापुरे, अजितसिंह गहिलोत, अंशुमनसिंह गहलोत यांनी केले.