ताज्या घडामोडी

पातूर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 2021 कार्यक्रमाचा समारोप

पातुर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये रंगली गीत आणि कवितांची मैफिल

अविनाश पोहरे – संपादक

पातुर येथील नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये मराठी भाषा संवर्धन विषयक विविध कार्यक्रम संपन्न झाले.गुरुवारी 28 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन पातूर नगरपरिषद ,किड्स पॅराडाईज, स्वरसंगित अकॅडमी, व साहित्य संघ पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.सर्वप्रथम या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष सौ प्रभाताई भीमराव कोथळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष अहेफाजोद्दिन, नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव ,आरोग्य सभापती राजु उगले, महिला व बालकल्याण सभापती तुळसाबाई गाडगे, सौ वर्षाताई बगाडे, सभापती मोहम्मद फैज, प्रा. विलास राऊत, साहित्यिक देवानंद गहिले, किड्स पॅराडाईज अध्यक्ष गोपाल भाऊ गाडगे, नगरपालिका अधीक्षक शिप्रा लोणारे, नगरपालिका प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख बी. पी . फलटणकर आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषेची अस्मिता आणि मराठी ही राज्यभाषा असल्याने तिचा वापर हा दैनंदिन वापरामध्ये परकीय भाषेचे आक्रमण थोपवून न घेता करण्याचे आव्हान यावेळी उद्घाटनाप्रसंगी नगरपालिकेचे अध्यक्ष सौ प्रभाताई कोथळकर यांनी व्यक्त केले
त्यानंतर बहारदार विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली यामध्ये पातुर नगरपरिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य कला सादर केली तर किड्स पॅराडाईज च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नृत्यकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर प्रा. विलास राऊत ,देविदास निलखन ,अर्चना उगले ,प्रा.करुणा गवई यांनी सुमधुर आवाजा मधून गित मंजुषा सादर केली यामध्ये प्रा .राऊत यांनी प्रश्नमंजुषा निर्माण करताना उत्तरे देणाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले एका पेक्षा एक सुरेख गीतांची मैफील यावेळी सादर करण्यात आली या गीतांना संगीताची साथ प्रा. विलास राऊत यांचेसह मंगेश राऊत, योगेश सुगंधी ,प्रवीण राऊत आदींनी दिली
त्यानंतर मराठी विषयी अभिमान आणि गौरव वाढविणाऱ्या कवितांचा पाऊस पातुर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये उपस्थित कवी मित्रांनी पाडून कार्यक्रमात अक्षरशा रंगत आणून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यामध्ये अशोकराव दशमुखे, प्रकाश खटे सर, डॉ. शांतीलाल चव्हाण ,देवानंद गहिले, कृष्णराव घाडगे, नारायणराव अंधारे ,प्रा. विठोबा गवई, प्रा. मुकुंद कवळकार ,संजय नेमाडे सर ,सौ.स्वाती जोशी मॅडम ,संजय गावंडे, नंदकुमार ठक,भारती ताई गाडगे आदींनी एका पेक्षा एक अशा सकस बहारदार तेवढ्याच संस्कार प्रधान कवितांचा पाऊस पाडून उपस्थितांची मने जिंकली श्रोत्यांची मने जिंकली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख बी .पी. फलटणकर सर तर सूत्रसंचालन सौ.स्वाती जोशी मॅडम यांनी केले.तर कवी संमेलनाचे बहारदार संचालन प्रा. करुणा गवई यांनी केले आणि आभार प्रदर्शन गोपाल गाडगे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी किड्स पॅराडाईज स्कुलच्या बाल पत्रकार विद्यार्थ्यांनी मराठी विषयी ज्ञान पडताळणीच्या दृष्टिकोनातून पातुर शहरात विविध महिला-पुरुष नागरिकांच्या मुलाखती घेऊन त्या नगरपालिकेच्या प्रांगणात स्क्रीनवर दाखवून मराठी जपणे किती आवश्यकता आहे याची जाणीव करून दिली.
सदर कार्यक्रमाला नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 1चे मुख्याध्यापक नारायण झाडोकार ,भीमराव कोथळकर, चंद्रकांत अंधारे, स्वाती गाडगे, अनिता तंबाखे,आशामती जाधव,दीपक सुरवाडे ,संतोष तेलंगडे,ऐनुद्दीन , देवेंद्र ढोणे, शालिनी ठक ,अश्फाक भाई ,फुलारी , मानमोडे आदीसह इतर मान्यवर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पातुर नगरपरिषदेचे चे पदाधिकारी तसेच कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: