ताज्या घडामोडी
पिंपरी चिंचवड शहर भाजपाने राम मंदिर निर्माणाला दिला एक कोटीचा निधी…

गरज पडल्यास आणखी निधी संकलन करू – आमदार महेशदादा लांडगे
किरण कुमार निमकंडे
संपादकीय सदस्य – अकोला एक्सप्रेस न्युज, पातूर
अयोध्या येथील भव्य राममंदिर निर्माणासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी आज श्री विनायक जी देशपांडे विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय महामंत्री यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आ.महेशदादा लांडगे,माजी खासदार अमर साबळे, महिला मोर्चा अध्यक्षा भाजपा सौ उमा खापरे, रा.स्व.संघ पुणे जिल्हा कार्यवाह श्री मुकुंद कुलकर्णी,महाराष्ट्र राज्य भाजपा सचिव अमित गोरखे, उपमहापौर केशव घोळवे,पक्षनेता नामदेव ढाके,स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,भाजपा शहर संघटक शिवकुमार बायस व अन्य नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.