प्रीती काकडे (एडतकर) यांचा पुणे येथे मृत्यू

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
अमरावती : दैनिक विदर्भ मतदारचे संपादक आदरणीय ऍड.दिलीपभाऊ एडतकर यांची ज्येष्ठ कन्या प्रीती दीपक काकडे (वय 32) यांचा पुण्याच्या कोथरूड भागात शुक्रवारी (ता.२९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका घटनेत अपघाती मृत्यू झाला.प्रीतीचा विवाह 22 मे 2011 ला नांदेड येथील दीपक काकडे यांच्याशी पुसद येथे झाला होता. त्या पती व लहानग्या आहना मुलीसमवेत पुण्याच्या कोथरूड भागातील भीमसेन उद्यानाजवळच्या परिनीता अपार्टमेंटमधे राहत होत्या. दरम्यान त्यांच्या दुर्देवी मृत्यूची वार्ता दुपारी एकच्या सुमारास धडकली.या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अड़. दिलीप एडतकर कुटुंबासमवेत पुण्याला रवाना झाले. प्रीती काकडे यांचे पार्थिव शनिवारी (ता.30)रात्रीपर्यंत अमरावती येथे आणले जाणार असून रविवारी (ता.३१) सकाळी हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जातील.प्रीती ताईच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.