महा नेट तंत्रज्ञान वापरून “ पालक मंत्र्यांची डीजीटल राहुटी” उपक्रमाचा भव्य शुभारंभ

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
अकोला जिल्हा मध्ये “पालक मंत्र्यांची डीजीटल राहुटी ” ह्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ अकोला जिल्हाचे पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२१ रोजी झाला. या उपक्रमाचा अंतर्गत खेड्यापाड्यातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेणे आहे व त्यांचे निवारण करणे आहे शासनाकडून जनतेला विविध सेवा देणे व त्या सेवेचे अंमलबजावणी होत आहे की नाही हे थेट जनतेशी संवाद साधून चर्चा करणे आहे.जिल्हामध्ये डीजीटल इंडिया अंतर्गत महानेट हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाकडून(महा आयटी) राबवण्यात येत आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड (high speed) इंटरनेट कॉनेक्टीविटी (internet connectivity) देण्यात येणार आहे. महानेट या प्रणालीचा वापर करून “पालक मंत्र्यांची डीजीटल राहुटी” हा उपक्रम यशस्वी पार पडला. या मध्ये मा. पालक मंत्री यांनी अकोला तालुक्यातील कळंबे व माझोड येथील नागरिकांशी दूरस्थ प्रणाली द्वारे थेट संवाद साधला व त्यांचा अडचणी आणि मनोगत जाणून घेतल्या. या वेळी या कार्यक्रमामध्ये मा. जिल्हाधिकारी पापळकर,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे ,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण,उप विभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी अधिकारी सहभागी झाले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग(महा आयटी)कलेक्टर ऑफिस,अकोला मधील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रमोदसिंग ठाकूर,राहुल पाटील,निलेश सावलतकर,हुसैन खान,नोमान खान,विशाल धोटे,सुरज खर्डे,नवीन कवल,निखील वानखडे,प्रशांत गावंडे यांनी आपले मोलाचे योगदान दिले.