ताज्या घडामोडी

पुण्यातील उद्योजकांना पातुर तालुका विकास मंचाचे आव्हान…

अविनाश पोहरे – संपादक

बाळापुर मतदार संघातील औद्योगिक मागासलेलेपण दूर करण्याकरता गणेश गाडगे यांच्या नेतृत्वात शनिवार ३० जानेवारी ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती किर्लोस्कर सन्सची पातुर तालुका विकास मंचाच्या पदाधिकारी यांनी स्नेह भेट घेतली आणी पातुर तालुक्यातील शेतीविषयक उत्पादन मालाची व शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, संगणक प्रशिक्षण व व्होकेशनल केंद्र, पातुर एम. आय. डी. सी येथे उभारण्याविषयी लवकरच केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे साकडे घातले जेणेकरून बाळापुर मतदार संघातील कृषी शिक्षण तसेच आय टी आय झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना पुण्या-मुंबई कडे न जाता स्थानिक एम आय डी सी मध्येच रोजगार मिळेल याकरीता भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश गाडगे तथा पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस,युवा सेना शहर प्रमुख योगेश फुलारी,किरण कुमार निमकंडे, रितेश सौंदळे गुरूजी, विक्रमसिंह बायस, योगेश सपकाळ, नितिन वानखडे यांनी चर्चेअंती सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: