ताज्या घडामोडी
सिरसो येथे तुरीच्या उत्पादनात घट

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी सिरसो मुर्तीजापुर
सिरसो येथे शेतकऱ्यांकडून पीक कापणी तसेच मळणी कामाला गती देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या उत्पादनातही कमालीची घट दिसून येत आहे. सोयाबीन व कापूस पीक हाताचे गेल्यामुळे शेतकऱ्यांना तूर पिकावर आशा होती. पण यंदाही पिकांनी शेतकर्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शेतकरी सोयाबीन, कापूस, पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. काही शेतकरी सलग तुरीची लागवड करतात. पण यंदा ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर विपरीत परिणाम होत उत्पादन घटण्याचे सांगण्यात येत आहे. तुरीवरील अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक बजेटच यामुळे बिघडलेले आहे. ही भरपाई कशी निघणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.