ताज्या घडामोडी

आई सेवा पुरस्कार

नितिन हुसे
तालुका प्रतिनिधी

” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी “या म्हणी प्रमाणे कुणी कितीही मोठे असले आणि त्याला आईचे प्रेम माया मिळत नसली तर त्याच्या कडे काहीच नाही असे म्हणतात .कारण आपली पहिली गुरू ही आपली जन्मदाती आई असते आणि आईची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य असते परंतु बदलत्या काळात आईकडे बघायला तिची विचारपूस करायला कुणालाही वेळ नाही .प्रत्येकाने एक लक्षात ठेवले पाहिजे की,आपण जीवनात किती ही मोठे झालो पैसा,धन,दौलत या सर्व काही गोष्टी मिळविल्या आणि जर आपण आपल्या जमदात्या आईला विचारत नसू तर तुमचे ते ऐश्वर्य कुठेतरी शून्य आहे असे वाटते .कुणीही आईला विचारत नाही.परंतु बाळापूर तालुक्यातील मनारखेड या गावातील एक CRPF मध्ये PSI असलेली व्यक्ती म्हणजे भावलाल काशिराम इंदोरे यांनी आई विषयीचे वेगळे प्रेम लोकांच्या निदर्शनास आणून दिले आजही आई ची सेवा करण्यात कुठेही कमी पडत नाही आईचे वय झाले असता तिची योग्य ती देखभाल करतात. व प्रत्येकाने आपल्या आईची सेवा केली पाहिजे असे त्यांना वाटते म्हणून त्यांना 26 जानेवारी 2021 पासून गावामध्ये एक वेगळा उपक्रम चालू केला व तो या पुढेही चालू राहणार आहे .तो म्हणजे ” आई सेवा पुरस्कार ” या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे गावातील जी सुनबाई आपल्या सासूला म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षाच्या वर आहे अश्या सासूची योग्य रित्या सेवा करीत असेल एक आपुलकीची वागणूक देत असेल तिची सेवा आपली सासूबाई न मानता आपली आईच आहे अश्या प्रमाणे करीत असेल अश्या गावातील सूनबाई ना साळी चोळी भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कार केला.जेणेकरून ती सूनबाई आपल्या सासूची योग्य सोय करेल म्हणजे तिला एक वेगळी प्रेरणा मिळेल व दुसरी सुनबाई सुद्धा तिचे पाहून आपल्या सासूची सेवा ही आई प्रमाणे करेल 26 जानेवारी 2021 या वर्षी पासून या पुरस्काराला सुरुवात केली व हा पुरस्कार दरवर्षी 26 जानेवारी ला देण्यात येईल असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. व बोलताना त्यांना गहिवरून आले पुरस्कार देताना मला एक वेगळा आनंद मिळत आहे व माझी गावातील नव्हे तर संपूर्ण जगाला हा संदेश द्यायचा आहे की आईची सेवा हीच उत्तम सेवा आहे आज मी या पुरस्काराची सुरुवात माझ्या गावापासून करीत आहे की सर्वांनी याची दखल घ्यावी आणि आपल्या जन्मदात्या आईची सेवा करावी असे सांगितले या वर्षी सासुबईची आई प्रमाणे सेवा करणाऱ्या 5 सुन बाईना आई सेवा पुरस्कार भावलाल इंदोरे व सौ.सविता भावलाल इंदोरे ,प्रेरणा भावलाल इंदोरे यांच्या हस्ते देण्यात आला त्यामध्ये सौ.रत्नाबई शंकर भामद्रे,सौ.सुमित्रा रामहरी डाबेराव, सौ. वर्षा गणेश सुऋषे,सौ. सुशीलाबाई संतोष लोड,रखमाबाई देवलाल इंदोरे यांचा समावेश आहे या वर्षी 5 सुनबाई ना हा पुरस्कार देण्यात आला परंतु यामध्ये वाढ होऊन हा पुरस्कार जास्तीत जास्त सुनबाई ना मिळावा अशी भावलाल इंदोरे यांची ईच्छा आहे.यावेळी
सरपंच डॉ सुराजदादा पाटील,उपसरपंच सौ.वैशाली गोपाल दिवनाले,सदस्य सौ.उज्वला राजेश लोड,सौ.लताबाई दिनकर सूरूषे,सौ.प्रमिला शरद दिवनाले,मेजर डी.के.सूरुषे,शिवशंकर लोड,विनोद मेसरे,अंबादास नागे, गजानन सूरूषे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जय गजानन भिंगे,सचिव सुधीर काळे,ग्रामपंचायत कर्मचारी गजानन वरुडकर तसेच जिल्हा परिषद मुख्याध्यापक सलामे सर व सर्व शिक्षक वृंद व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: