ताज्या घडामोडी
लोकमान्य प्रतिष्ठान कडून ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा…
अविनाश पोहरे – संपादक
राजे शिवाजी नगर मधील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या प्रांगणात ७२ वा प्रजासत्ताक दिन खुप उत्साहात ध्वजारोहण करून तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देवून साजरा करण्यात आला.२६ जानेवारी १९५० साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा सर्व भारतवासीयांनी स्वीकार करून देशाला प्रजासत्ताक सार्वभौमत्व अशी लोकशाहीची नीव रोवल्या गेली होती याचाच आजपर्यंत देशवासी अनुकरण करत आहेत.
या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे माजी महापौर राहुल जाधव,पातुर तालुका विकास मंचचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस,शरद रोकडे,सुधाकर लोखंडे,मल्लिनाथ कुंभार,बाळासाहेब बाबरे, राजेश शेळके,बजरंग पवार, महेंद्र मंडलीक,आत्माराम डोके,एकनाथ महाराज नरवडे, संतोष हरणे आदी मान्यवर उपस्थीत होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.












