ताज्या घडामोडी

डोंगरगाव येथील विजयी उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी पातूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी

पराजित पॅनल यांनी केलेल्या कृत्या प्रकरणी गुन्हे दाखल असून सुद्धा अद्याप अटक नाही

एका आमदाराचा डोंगरगाव येथील झालेल्या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रशासनाला दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पातूर येथील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष शंकर बोचरे यांनी केला आहे.

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

अकोला जिल्ह्यातील ग्राम डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना नुसार लोकशाही मार्गाने तसेच बहुमताने निवडून आलेल्या माळी समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या विजयोत्सवा दरम्यान विरोधी गटाच्या काही समाजकंटकांनी दगडफेक करत लहान निष्पाप मुलं,मुली,महिला,जेष्ठ नागरिक यांना जखमी करून त्यांची मनोवृत्ती दर्शवित अत्याचार केल्याचे समोर येत आहे.विरोधी गटातील भ्याड हल्ला करणारे हे एका आमदाराचे जवळील व नात्यातील असल्याने आमदार याचा दबावाव पोलीस प्रशासनान असल्याचे मत पातूर येथील नेते यांनी केले आहे,व आरोपींन विरोधात गुन्हे दाखल केले तरी सुद्धा गावात फिरताना चित्र दिसून येत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मत स्थानिक नेते यांनी केले आहे यासाठी पातुर शहरातील समस्त माळी समाज व इतर समाजातील नागरीकांत रोषाचे वातावरण आहे. यासाठी माळी समाजातील पदाधिकारींनी दोषींना कडक शासन व्हावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय तिथे जाऊन त्याबाबतचे निवेदन तहसीलदार दिपक बाजड यांना दिले आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची पायामल्ली ही डोंगर गाव येथील निवडणुकी मध्ये पराभूत झालेल्या पॅनल कडून होतानाचा प्रकार घडल्याचे प्रकार दिसत आहे. यावेळी प्रशासनाची काय भूमिका राहिल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या घटनेचे उमटलेले पडसाद लवकरच महाराष्ट्रात दिसुन येतील असा इशारा माळी समाज संगठनेनी यावेळी दिला आहे.
या आंदोलनात व निवेदन अकोला जिल्हा माळी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बारताशे यांच्या नेतृत्वात पातुर तहसीलदार यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व शासनाचे गृहमंत्री यांना देण्यात आले आहे यावेळी जि.प.सदस्य सुनिल फाटकर,माजी पातुर पंचायत समिती सभापती बालूभाऊ बगाडे,महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे, श्रीराम सेना विदर्भ संयोजक मंगेश गाडगे, नगरसदस्य राजूभाऊ उगले,प्रविन इंगळे , शिलाऀ ग्रामपंचायत सदस्य मंगल डोंगरे , भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बारोकार, दिनेश गवई, अण्णा पोहरे,सचिन बायस,वंचित चे डॉ ओमप्रकाश धर्माळ, पातूर पंचायत समिती सदस्य अनिल राठोड, सचिन ढोणे,माजी न.प. सदस्य गुलाब गाडगे, माजी,न.प सदस्य विजय काळपांडे,शिलाऀ ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे, संभाजी ग्रृपचे पै.कैलास बगाडे, गजानन बारताशे, वंचित चे राजू बोरकर,परशराम बंड, अजिंक्य निमकंडे ,महेश बोचरे , पातुर युवा शहरप्रमुख योगेश फुलारी,किरण कुमार निमकंडे,गणेश गाडगे, संस्ती येथील सुनिल बंड , पंकज शेगोकार,व मोठ्या प्रमाणात समाज बांधव व सर्व पक्षातील पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: