ताज्या घडामोडी

दर्यापूर नगरीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आगमना निमित्त समाज बांधवांची नियोजन चर्चा संपन्न

डॉ.संदीप सुशीर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

२८/१/२०२१ दर्यापूर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दर्यापूर नगरीत आगमना निमित्त समस्त धनगर समाज बांधव दर्यापूर तालुक्याच्या वतीने डॉ.संदीप सुशिर नारायण नगर दर्यापूर यांच्या निवासस्थानी गुरुवार दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता नियोजन चर्चा ठरविण्यात आली होती.या चर्चेमध्ये दि.31 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचे स्वागत करण्यात येणार आहे व त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर पॉईंट एसटी आगार समोर मुर्तीजापूर रोड दर्यापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे व त्यानंतर शासकीय विश्रामगृह दर्यापूर येथे धनगर समाज बांधव व कार्यकर्ते यांच्यासोबत माननीय गोपीचंद पडळकर साहेब सामाजिक व इतर विविध विषयांवर संवाद करतील.असे नियोजन चर्चे दरम्यान समस्त दर्यापुर तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अरविंदजी पावडे,श्रीधरभाऊ कोल्हे,साहेबराव नागे,गोपालराव नागे,दादारावजी जोगी,संजयभाऊ घटाळे,अमोल नवलकार,हरिभाऊ नागे,प्रदीप पातूर्डे,गंगाधर साबे,गोपालभाऊ नवलकार,माणिकराव नागे,दिगंबर नवलकार,उमेश नागे,गजानन पातुर्डे,पंजाबराव नागे,अतुल नवलकार,हरिदास नवलकार,श्रीकृष्णभाऊ नवलकार,संजयभाऊ हांडे, डॉ.संदिप सुशीर सह दर्यापुर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव नियोजन चर्चे करिता तन-मन-धनाने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: