शहराच्या विकासा सोबत अविकसित ग्रामिण भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आपला आवाज न्यूज नेटवर्क ने करावा…

ठाकुर शिवकुमारसिंह बायस संयोजक पातुर तालुका विकास मंच..
अविनाश पोहरे – संपादक
आपला आवाज न्यूज नेटवर्क चॅनल परीवाराच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्त शहरातील सर्वात मोठे असे रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे कार्यक्रमाला व्यासपिठावर उपस्थीत संसदरत्न खा.श्रीरंग आप्पा बारणे,भाजपा शहराध्यक्ष आ.महेशदादा लांडगे, महापौर सौ.माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,भारताचे आयर्न मॅन पोलीस कमिश्नर कृष्ण प्रकाश सिंह,आपला आवाज चे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी,अभिनेत्री अक्षया देवधर आणी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, पर्यावरण,उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पुरस्कार विजेते, पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे दिग्गज मंडळी व हजारोंच्या उपस्थीतीने भरलेल्या सभागृहात पातुरच्या एका गरीब व सामान्य माणसाला त्याचे विचार मांडण्याची सुवर्ण संधी मिळाली.त्या संधीचं सोनं करीत त्यांनी तेथे ही पातुरच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष वेधण्याचं काम करत तेथील उद्योजकांना आपल्या ग्रामीण भागात येवून आपले उद्योग सुरू करण्याचे आव्हाहन केले आहे याचा सार्थ अभिमान पातुर तालुका विकास मंच आणी पातुर वासियांना आहे.