पशुसंवर्धन विभाग दर्यापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दि.२६/१/२०२१ दर्यापूर :- तालुका पशुसंवर्धन सहाय्यक उपआयुक्तालय व तालुका पशुवैद्यकीय सर्व पशुचिकित्सालय दवाखाना दर्यापूर येथे तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व गोसेवक पशुपालक व प्रतिष्ठित नागरिक बऱ्याच संख्येने उपस्थित असून मोठ्या उत्साहात सन्मानपूर्वक प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दर्यापूर तालुका सहाय्यक उपआयुक्त डॉ.नंदकिशोर अवघड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून राष्ट्रगीताने व राष्ट्रध्वजाला सलामी करत तसेच प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशा घोषणा देऊन जयघोष करण्यात आला.पशुवैद्यकीय सर्व पशुचिकित्सालय दर्यापूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत अस्वार साहेब यांच्या तर्फे मिठाई वाटप करण्यात आले.तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्वांना चहा नाश्ता देण्यात आला.उपस्थित सर्वांनी एकमेकांना कोणताही प्रकारचा मनामध्ये हेवादावा न ठेवता मनोमिलन व सलोख्याच्या भावनेने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मोठ्या आनंदाने राष्ट्रध्वजाचा सन्मान करीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग दर्यापूरचे पशुधन विकास व विस्तार अधिकारी डॉ.दिलीप देशमुख साहेब व पशुवैद्यकीय दवाखाना थीलोरी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.दयाराम थोटे साहेब,पशुधन पर्यवेक्षक डॉ.ढोरे साहेब,परिचर लोखंडे व दर्यापुर तालुक्यातील गोसेवक संदीप सुशीर,सतीश वानखडे,सिद्धार्थ वाकपांजर,अनिल गवई,दिलीप खंडारे,पंकज इंगळे, प्रवीण चव्हाण,सुनील अटंबर,नितोने मॅडम व समस्त गोसेवक मित्र मंडळ अधिकारी कर्मचारी पशुपालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.