ताज्या घडामोडी
नवदाम्पत्याचा अनोखा उपक्रम..लग्नाला केले रक्तदान शिबिराचे आयोजन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
पातुर तालुक्यातील ग्राम तांदळी बु येथील सागर नाकट या तरुणाचा तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील दिव्या काळे हिच्याशी दि. 09/12/2020 रोजी विवाह संपन्न झाला. समाजात एक नविन आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. 10/12/2020 रोजी ग्राम तांदळी बु येथे या नवदाम्पत्याने रक्तदान शिबीर आयोजित केले. आणि येणार्या नविन पिढीला व समाजाला एक नविन आदर्श निर्माण करुन देण्याचा हा एक यशस्वी प्रयोग करुन दाखवला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतुन नवदाम्पत्याचे कौतुक करण्यात येत आहे. खरंतर लग्न म्हटले की पैशांची उधळपट्टी आज सर्वसामान्य करताहेत परंतु असे उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरत आहेत. यांचा आदर्श नागरीकांनी घ्यायला हवा.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.