पातूर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

अविनाश एस. पोहरे – संपादक
पातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपाचे यांचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांना वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांतर्गत साजरा करण्यात येत आहे.पातूर येथे 12 डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटपाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पातूरच्या वतीने करण्यात आले. तरीपरिसरातील गरजू रुग्णांनी या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, रा.काँ. माजी अध्यक्ष हिदायत खा रूम खा विद्यमान गटनेते न. प. पातूर,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मोहम्मद मेहताब अब्दुल रऊफ, कृष्णा बोंबटकार रा.काँ.युवक अध्यक्ष यांनी केले आहे.
या शिबिराचे ठिकाण लोकसेवा बिछायत केंद्र जवळ, डॉक्टर नालिंदे दवाखाना वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत राहील.तरी जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.