वंचित बहुजन आघाडीतर्फे बिडिओ यांना निवेदन… रमाई आवास योजनेंतर्गत येणाऱ्या घरकुलांचे टप्पे न मिळाल्यामुळे….

हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
संपूर्ण देशात कोरोना या महामारिमुळे जनता त्रस्त झाली असताना त्यांच्या हाताला काम नाही बेरोजगारी आपल्या उंबर ठ्यावर पोहोचली असून कित्तेक जणांची स्वप्ने भंग झाली आहे. त्यातच प्रत्येकाचं स्वप्न अस्त की आपले पण एक छान असे घर असावे. ज्यासाठी सरकार रमाई आवास योजनेंतर्गत त्यांच्या स्वप्ननांना पूर्ण करण्यास मदत करते. परंतु तालुक्यातील काही गावातील लोकांचे रमाई आवास योजनेतील टप्पे आलेले नसल्यामुळे त्यांची कामे रखडली आहेत. त्यांना आपली कामे धंदे सोडून आपली मजुरी पाडून तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागत असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण सध्या प्रवासासाठी उपयुक्त अशी सुविधा चालू नसल्याने दळणवळण यंत्रणा मंद असल्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडी तर्फे पंचायत समिती मुर्तिजापूर बिडिओ यांना लवकरात लवकर रखडलेली घरकुलाची टप्पे त्यांना देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे मुर्तिजापूर तालुका महासचिव सचिन दिवणाले यांनी दिला. यावेळेस वंचित बहुजन आघाडी चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.