पातूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा…

दि : 08/12/2020 रोजी पातूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द न करता केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्यांच्या वतीने आज ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.या भारत बंदला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पातूर तालुका व शहर कडून भारत बंदला समर्थन देण्यात आले होते..पातूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संपूर्णरित्या पाठिंबा देत आज पातूर शहरात रास्ता रोकुन कडकडीत बंद पाळण्यात आला या वेळी उपस्तीत:शेतकरी नेते कृष्णा अंधारे हिदायत खा रूम खा,कृष्णा बोंबटकार,प्रमोद मुरूमकर,मनोज तायडे,,मेहताब भाई, बब्बू पहेलवान,शारिक भाई, राहील इकबाल,सलमान खान, मुझम्मीन जमदार,राहुल वाघमारे,अनिस भाई, सचिन चव्हाण, गणेश तायडे,राजू गोतरकार इत्यादी उपस्थित होते.