राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार समारंभ व पक्षप्रवेश संपन्न

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
अकोला दि. ७ डिसें.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी महिला सेल, सामाजिक न्याय विभाग महिला व महानगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे जिल्ह्यातील महिलांचा व युवतींचा पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजियाताई खान यांची विशेष उपस्थिती होती.खा. फौजियाताई खान यांची राज्यसभा खासदार पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच अकोला आगमन प्रसंगी त्यांचा हृद्य सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संग्रामभैया गावंडे,माजी मंत्री मा.गुलाबरावजी गावंडे, विधान परिषदेचे आमदार अमोलदादा मिटकरी, राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव तथा प्रवक्ता डॉ. आशाताई मिरगे,माजी आमदार तुकारामभाऊ बिरकड,हरीदासजी भदे,बळीरामभाऊ शिरस्कार,महिला जिल्हा निरीक्षक मा.सोनालीताई ठाकूर,महानगर अध्यक्ष राजकुमारजी मुलचंदानी,युवक जिल्हा अध्यक्ष शिवादादा मोहोड व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच सावकारग्रस्त शेतकरी कायदा सुधार समितीवर महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केल्याबद्दल डॉ. आशाताई मिरगे यांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रिझवाना अझीझ शेख यांना फौजियाताई खान यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा सौ.सुषमाताई कावरे यांच्या सामाजिक कार्याला प्रभावित होऊन जिल्हाभरातून आलेल्या ओबीसी महिलांचा, अकोला महानगरातील सामाजिक न्याय विभागाच्या महिलांचा व महानगरातील युवतींचा पक्षप्रवेश पार पडला. तसेच जिल्ह्यातील तालुका व शहर निहाय ओबीसी महिला पदाधिकारी, सामाजिक न्याय विभागाच्या महिला पदाधिकारी व महानगर युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रसंगी मूर्तिजापूर तालुक्यातील दिपालीताई देशमुख, उज्वलताई ढाकुलकर,रंजनाताई सदार,नम्रताताई भिंगारे,वर्षाताई कावरे,आशाताई कावरे, सुनिताताई मोहोड, दुर्गाताई कुरमी,ज्योतीताई मेहरे, कांताताई सोनोवने,राजकन्याताई काळे,संगीताताई टापरे, संध्याताई कडू,बाळापूर तालुक्यातील पूजाताई धनोकार, श्वेताताई तुर्के, मनिषाताई चव्हाण, सुनंदाताई भारसाकळे,अर्चनाताई हिराळकार, संतोषीताई सोनोने,मालिनीताई गाडेकर, शाहेदा परवीन, अस्मा परवीन, योगिताताई जुमळे, अकोला तालुका- सुमय्याताई शेख, वनमालाताई इंगळे, बार्शीटाकळी तालुका- मिराताई जाधव, ताजबी शेख हुसेन, नेहाताई राऊत,गोदावरीताई राठोड या ओबीसी महिलांनी पक्षप्रवेश केला.त्याचप्रमाणे युवती च्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे : महानगर महासचिव कु.वैष्णवी ताथोड,उपाध्यक्ष कु.रोशनी शिरसाट, कु.निकीता शिरसाट,कु.चैताली निम,सरचिटणीस कु.मयूरी कडु,कु.प्रिती इंगळे,कु.वैष्णवी राऊत,सचिव कु.पूनम घ्यारे,सहसचिव कु.निकीता रायबोले व कांचन पाचपोर.
नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून राष्ट्रवादी पक्ष करीत असलेल्या सर्वसमावेशक कार्याची माहिती दिली व पक्ष संघटन वाढविण्यासाठी जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन केले.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अकोला तर्फे हा सप्ताह “शरदपर्व” सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचाच भाग म्हणून महिला मेळावा व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरफराजभाई, रविभाऊ राठी, शिवदासजी शेळके,करणभाऊ दोड, निझामभाई, पुंडलीकराव अरबट, भारतीताई निम, विद्याताई अंभोरे, अकिलाताई शाह, मनीषाताई देशमुख, सुषमाताई कावरे, संज्योतीताई मांगे, सुनीताताई ताथोड, ज्योत्स्नाताई मुगल, वर्षाताई पारसकर, शारदाताई थोटे, दिपमालाताई खाडे, सुषमाताई राठोड, रिझवानाताई, माधुरीताई गवई, विष्णुभाऊ लोडम, सतिषदादा गावंडे, राजूभाई खान, जावेदभाई, अझीझभाई यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा, अकिलाताई शाह, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुषमाताई कावरे, सामाजीक न्याय विभागाच्या महानगर अध्यक्षा संज्योतीताई मांगे, महानगर महिला अध्यक्षा रिझवानाताई व महानगर युवती अध्यक्षा मेघनाताई पाचपोर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संज्योतीताई मांगे यांनी तर आभार प्रदर्शन मनीषाताई देशमुख यांनी केले.