ताज्या घडामोडी

पातुर तालुक्यातील झरंडी येथील गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे ; गावकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा

अमोल करवते , ब्युरो चिफ

पातुर तालुक्यातील येथील झरंडी येथील रस्त्यावरअसलेले अतिक्रमण काढण्यात यावे याकरिताे गावातील नागरिकांनी या रस्त्याबाबत ची तक्रार तहसिलदार यांचेकडे 4 डिसेंबर रोजी दिली असून सदरची अतिक्रमणन काढल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारीतून देण्यात आला आहे
या तक्रारीवर गावाजवळ
श्रीराम राठोड , शंकर राठोड , आत्माराम राठोड यांनी अतिक्रमण करून वर्षानुवर्षे वायवटीत असलेला रस्तायाबाबतची तक्रार करण्यात आली आहे
परंतु सदर सदर तक्रार वर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे उपोषणाचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे
नकाशा मध्ये स्पष्टपणे नोंद असलेला पाच आनाचा रस्ता अडवल्यामुळे गावकऱ्यांना फार लांबचा प्रवास करून गावात यावे लागते रस्ता अडवणारे धनदांडगे व राजकीय प्रभावाखाली असून त्यांचे नातेवाईक महसूल विभागातील निवृत्त अधिकारी असल्यामुळे शासकीय यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याची भीती यापूर्वीच्या निवेदनात गावकऱ्यांनी व्यक्त केली होती असे असूनही अद्यापही न्याय न मिळाल्यामुळे गावकर्‍यांची ही भीती खरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे यातील अतिक्रमण करणाऱ्या राठोड यांनी त्यांचा प्रभाव टाकून तक्रार कर्त्याना त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत याची सुद्धा प्रशासनाने दखलघेतली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे तक्रार कर्त्यांचे जीवनास धोका झाल्यास त्याला जबाबदार महसूल प्रशासन राहील असा इशारा देण्यात आला आहे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामामध्ये सुद्धा अडथळा निर्माण केला असून अल्पभूधारक गरिब आदिवासी
शेतकऱ्यांच्या शेतातून जबरदस्तीने 60 फूट रस्ता कुटुंबाचे शेतांमधून बळजबरीने रस्ता करून दुजाभाव करूनअन्याय केला असे या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे त्यामुळे नकाशा दर्शविल्याप्रमाणे सदर रस्ता जनतेसाठी खुला करावा अन्यथा आम्हाला उपोषण करण्यापलीकडे दुसरा कुठलाच मार्ग राहणार नाही असा इशारा येथील गावकऱ्यांनी पातुर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे या निवेदन देणाऱ्यांमध्ये सुभाष राठोड, पंजाब राठोड ,तारासिंग जाधव, योगेश जाधव ,राहुल जाधव,हिरामण राठोड, रामदास लठाड,अंकुश राठोड, विक्रम जाधव ,मधुकर जाधव , रामराव डाखोरे ,परसराम जाधव,आदींनी दिला आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: