दर्यापूर येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांची 245 वी जयंती निमित्त अभिवादन

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दर्यापूर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पॉइंट एसटी आगार समोर दर्यापूर येथे समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती दि. 3/12/2020 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, अखेरचा सार्वभौम महाराजा भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाणारे,संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात,सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता वेलस्ली सारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणारे, इंग्रजाना 18 वेळा पराभुत करणारे एकमेव छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. त्यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप सुशीर, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष सदानंद नागे, संजयभाऊ हांडे,माणिकरावजी नागे,नंदकिशोर कोगदे,संजय पातूर्डे,ऋषिकेश लाखे,दिगंबर नवलकार,गजानन पातूर्डे, गोपाल पांडे,संतोष पातोंड,रोशन राऊत,पिंटू राऊत,संतोष पावडे,कातकडे,सुरज गोडांबे,गोपालभाऊ नागे,संदीप पातूर्डे,प्रवीण घुरडे मनोज बंडगर संतोष माने, सुरज गादे, सौरभ पंडित सह समस्त दर्यापुर तालुक्यातील सर्व धनगर समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ व नवनिर्वाचित समाजसेवक, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करीत बहुसंख्य धनगर समाज बांधव शासनाच्या नियमांचे पालन करीत उपस्थित होते