पातूर भाजपाचे न.प मुख्याधिकारी यांना निवेदन , घरकुल निधी जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा!
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
आज दिनांक ७-१२-२०२० रोजी भारतीय जनता पार्टी पातूर शहराच्या वतीने मुख्याधिकारी नगर परीषद यांना निवेदन देण्यात आले , पातूर येथील शेकडो गरजू, बेघर, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांनी आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक लक्ष व केंद्र शासनाकडून दीड लक्ष रुपये असा एकूण अडीच लक्ष रुपयांचा निधी दिला जातो. पातूर नगर परिषद यांच्या दुर्लक्षीत व्यवहारामुळे वर्ष लोटूनही पातूर नगरीतील लाभार्थ्याना निधी प्राप्त झालेला नाही. पहिल्या यादीतील लाभार्थ्यांची ही अवस्था असतांना , दुसऱ्या यादीतील अनेक लाभार्थ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.तरी पातूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाला विचारात घेऊन तात्काळ निधी जमा करण्याचे आदेश द्यावे व लाभार्थ्यांची दुसरी यादी तात्काळ मंजूर करण्यात यावी, सात दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास ,भारतीय जनता पार्टी पातूर शहरातर्फे तीव्र ठिया आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित म्हणून राजु उगले , अभिजीत गहिलोत , महिला आघाडीच्या सौ.वैशाली निकम , सौ.कल्पना खराटे , सौ.शितल हिरळकार , संदीप तायडे , राजेश आवटे ,किरण निमकंडे , गणेश गाडगे , निशांत बायस , सचिन बारोकार ,सचिन बायस ,सचिन शेवलकार ,दिलीप बगाडे ,प्रभाकर कवर ,विष्णु शेलारकर ,गजानन गुजर ,नितीन खंडारे ,दिनेश करपे ,सतीश इंगळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.












