मेडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६६ युवकांनी केले रक्तदान

अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होणारा रक्ताचा तुटवडा कमी करण्याकरिता मेडशी येथील युवकांनी पुढाकार घेऊन आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करणार्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी मेडशी येथे अमोल तायडे, प्रसाद पाठक व शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला मेडशी वासियांनी भरघोस प्रतिसाद देऊन ६६ जणांनी असल्यामुळे रक्तदान केले यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी ठाणेदार सोनवणे, सिद्धार्थ वाघमारे( वनपरिक्षेत्र अधिकारी ), श्याम बनसोड यांचे सहकार्य लाभले अधिकाऱ्यांनी सुद्धा आपले रक्तदान केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जि. प. सदस्या लक्ष्मी प्रदीप तायडे, पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई रामभाऊ साठे, माजी ग्रामपंचायत सदस्य शेख जमीर शेख गनीभाई ,माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप भास्कर तायडे, अभिजीत मेडशीकर, ज्ञानेश्वर मुंडे, वैभव तायडे तसेच अमोल तायडे मित्रपरिवार आदींनी सहकार्य केले प्रतिसादाबद्दल मेडशीमध्ये कौतुक करण्यात येत आहे