द प्रोफेशनल करिअर अकॅडमी व महात्मा फुले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

मा. आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानवाला आदरांजली…
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क,पातूर
पातूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा फुले स्मारक येथे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहूउद्देशीय संस्था व महात्मा फुले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले मा आमदार अमोल मिटकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पातूरचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते हिदायत खान रूम खान, कर्तव्यदक्ष ठाणेदार हरीश गवळी, द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे, मुफ्ती हकीम साहब,माजी मुख्याध्यापिका कमलाबाई उगले, परशराम उंबरकर, अलकाताई उगले माजी सभापती, डॉ निलेश वानखडे, विशाल बोरे शासकीय पत्रकार, सरपंच रिनाताई शिरसाट, निर्भय पोहरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात महामानवाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून व वंदना पठन करून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक निलेश गाडगे, पंकज पोहरे, सुरेंद्र उगले होते.आमदार अमोल मिटकरी यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकून ते म्हणाले “डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्धांचेच नाही तर संपूर्ण भारत देशाचे आहेत, आणि मी त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकार व त्यांच्या पुण्याईमुळे मला आज आमदार होता आलं ” सामान्य वर्गातील मुलींना डॉक्टर, वकील, इंजिनियर, होता आलं ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे “. अश्या प्रखर शब्दातून त्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले.
यांनतर पातूरची कन्या सामान्य कुटुंबातील पल्लवी पांडुरंग गोतरकार हिची एम.बि.बि.एस ला निवड झाल्याबद्दल तिला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके, शाल देऊन मा. आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते गौरविन्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र उगले यांनी केले तर पातूर चे तडफदार शिस्तबद्ध नेतृत्व, वक्तृत्व असलेले निलेश गाडगे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळून सूत्रसंचालन केले.व लवकरच पातूर मध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व अभ्यासीका निर्माण करू अशी घोषणा केली.
सदर कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क, सॅनिटायजर, व सोशल डिस्टन्स चे पालन करून घेण्यात आला. या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी केले.या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रदीप काळपांडे, प्रवीण इंगळे, बळीराम खंडारे, गोपाल गाडगे,अविनाश पोहरे, प्रा. विलास भराडी, प्रा. शंकर गाडगे, किरण कुमार निमकंडे, गौरव डोंगरे, स्वप्नील सुरवाडे,योगेश इंगळे, कृष्णा बोंबटकार, प्रवीण डोंगरे,मोहन गाडगे, सतिश कांबळे, मेहताब भाई, निखिल इंगळे, सागर काढोने, कपिल पोहरे, राम वाडी, सतीश सरोदे, प्रमोद कढोणे,निखिल उपर्वट, विपुल पोहरे, प्रवीण पोहरे, शुभम उगले, हर्षल ठक, शुभम पोहरे, अमोल करवते, तुषार सिरसाठ, अर्जुन गहीलोत इत्यादी उपस्थित होते.